गावाविषयी माहिती
ग्रामपंचायत औदानेपाडा (कौतिकपाडा) हे बागलाण तालुक्यातील निसर्गरम्य डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेले एक सुंदर गाव आहे. हिरव्यागार शेतजमिनी, श्रमशील शेतकरी, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वैभव यामुळे गावाला एक वेगळी ओळख आहे.
२०११ जनगणना – गावाची लोकसंख्या
एकूण लोकसंख्या
0
एकूण कुटुंबे
0
पुरुष
0
महिला
0
लिंग गुणोत्तर
९३४ (महाराष्ट्र सरासरीपेक्षा जास्त)
साक्षरता
८४.०५% (पुरुष: ८९.००% | महिला: ७८.६४%)
बालसंख्या (0–6)
२४६ (११.७४%)
SC/ST लोकसंख्या
SC – ०.२९% | ST – १०.३६%
👉 यावरून दिसून येते की गाव शिक्षणाच्या बाबतीत प्रगत आहे आणि शेती ही मुख्य व्यवसाय आहे. त्याच बरोबर बांधकाम कामगार या गावात मोठ्या प्रमाणात आहेत.
गावातील शेती आणि पिके
गावाची मुख्य ओळख म्हणजे शेती. बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असून गावात प्रामुख्याने खालील पिके घेतली जातात:
भाजीपाला
मका
ज्वारी / बाजरी
कापूस
सोयाबीन
गहू
हंगामी पिके
काही भागात द्राक्षे, डाळिंब आणि कांदा उत्पादनही सुरू आहे.
हवामान आणि भौगोलिक वैशिष्ट्ये
बागलाण तालुका हा डोंगररांगांनी वेढलेला आहे. त्या रांगा मधील पश्चिमेला हे गाव आहे.
हवामान उष्ण व उपोष्णकटिबंधीय प्रकारचे आहे.
उन्हाळ्यात तापमान साधारण २०°C ते ३५°C तर पावसाळ्यात चांगला पाऊस होतो.
गावाच्या परिसरात टेकड्या, दऱ्या आणि नैसर्गिक सौंदर्य आढळते.
हवामान उष्ण व उपोष्णकटिबंधीय प्रकारचे आहे.
उन्हाळ्यात तापमान साधारण २०°C ते ३५°C तर पावसाळ्यात चांगला पाऊस होतो.
गावाच्या परिसरात टेकड्या, दऱ्या आणि नैसर्गिक सौंदर्य आढळते.
गावाच्या विशेष गोष्टी
}
ऐतिहासिक स्थळे
साल्हेर किल्ला, मुल्हेर किल्ला, मांगी-तुंगी या पर्वत ऐतिहासिक व धार्मिक स्थळ गावाच्या आजूबाजूला असल्यामुळे परिसराला ऐतिहासिक व पर्यटनाचे महत्व लाभले आहे.
सांस्कृतिक वैशिष्ट्ये
गावातील लोक एकोप्याने व सामूहिक संस्कृतीने जगतात. पारंपारिक सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात.
ग्रामपंचायत व स्थानिक सुविधा
ग्रामपंचायत कार्यालय
आपले सरकार सेवा केंद्र CSC center
शैक्षणिक सुविधा
प्राथमिक शाळा, E-learning, डिजिटल शाळा
कृषी सेवा
शेतकरी व कृषी सेवा सुविधा
पाणीपुरवठा
RO वॉटर फिल्टर कमी पैशात स्वच्छ पाणी
गावाची छायाचित्रे
महिला प्रशिक्षण,हर घर तिरंगा अभियान,गटविकासअधिकारी यांची गावाला भेट,विकास कामांचा भूमिपूजन आजी माजी आमदार यांचा कडून उद्घाटन
गावात CCTV,RO वॉटर फिल्टर,dasbin वाटप
माननीय आमदार साहेब यांच्याकडून ग्रामपंचायत यास पाच हजार लिटरची टॅंकर मिळाले
आमचे ध्येय
ग्रामपंचायत औदानेपाडा (कौतिकपाडा) चे ध्येय आहे की गावाचा सर्वांगीण विकास करणे, शेतीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, शिक्षणाचा स्तर उंचावणे आणि ग्रामीण जीवनाचा जास्तीत जास्त विकास करणे.
सर्व महत्वाच्या शासकीय वेबसाईट

महाराष्ट्र शासन

भारत शासन

शासन निर्णय

आपले सरकार

माहिती अधिकार
अर्ज डाउनलोड करा
| अनुक्रमांक | अर्जाचे नाव | डाउनलोड करा |
|---|---|---|
| 1 | स्वयंघोषणा पत्र -रहिवासी दाखला | Download |
संपर्क
ग्रामपंचायत कार्यालय
- ग्रामपंचायत औदानेपाडा (कौतीकपाडा) तालुका–बागलाण, जिल्हा–नाशिक
- nskgp12aundanepada@gmail.com
- 9370307020
फॉर्म भरा